Sunday , October 4 2026
Breaking News

नाथ पै तलावात युवकाचा बुडून मृत्यू; एच. ई. आर. एफ रेस्क्यू टीमने मृतदेह बाहेर काढला

Spread the love

 

बेळगाव : नाथ पै तलावात बदकांची अंडी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवार (३ ऑक्टोबर) रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

सतीश शशिकांत कदम (वय ३०), रा. लोहार गल्ली, अनगोळ, बेळगाव असे मृत युवकाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच एच. ई. आर. एफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून तलावात शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर सतीश कदम यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, तलाव, विहीर किंवा अन्य जलाशयांमध्ये उतरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज नसताना पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *