


बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या वतीने रविवार, दि. १० जानेवारी २०२७ रोजी भव्य जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैलवान मारुती घाडी यांच्या शास्त्रीनगर येथील निवासस्थानी रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणपतराव पाटील होते.
यावेळी संघटनेच्या संचालकपदी वैभव खाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष पैलवान मारुती घाडी यांनी यंदाचे कुस्ती मैदान भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांचा १०७ वा वाढदिवस आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात साजरा करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीला गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी सर, राजेंद्र कलघटगी, डॉ. गणपतराव पाटील, हिरालाल चव्हाण, संतोष होंगल, वैभव खाडे, विनोद चौगुले, मनोहर गावडा, नरहरी माळवी, राजू मजुकर, संजय चौगुले, भूमेश बिर्जे, मोनाप्पा मोरे, मुन्ना नसरदी, स्वस्तिक मोरे, ओम घाडी, समिधा बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
संतोष होंगल यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta