Friday , November 6 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाकडून काळ्या दिनाबाबत जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहापूर विभागाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत काळ्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी शहापूर समितीचे ज्येष्ठ नेते नेताजी जाधव आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काळा दिनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत राजकुमार बोकडे, अभिजीत मजुकर आणि गजानन शहापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीला परशराम शिंदोळकर, शिवाजी उचगावकर, कृणाल कोचेरी, दीपक तुळसकर, राहुल बोकडे, रजत बोकडे, आकाश मठवाले, राजू नेसरीकर, रवी जाधव, दीपक गौंडडकर, रवि पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

रणजीत हावळानाचे यांनी बैठकीची प्रस्तावना केली आणि आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *