Friday , November 6 2026
Breaking News

काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : म. ए. युवा समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.
भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल प्रदेश तत्कालीन केंद्र सरकारने कन्नड भाषिक म्हैसूर राज्यात अन्यायाने डांबला गेला. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी १९५६ पासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. यावर्षीच्या काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे तरी सर्व मराठी भाषिकांनी मूक सायकल फेरीत सहभागी होत मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा तसूभरही कमी झाली नाही हे दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले.
यावेळी मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला.
सीमाप्रश्न सुटणार ही शंभर टक्के खात्री असून आता मुंबई पासून दिल्लीपर्यंत जोरदार प्रयत्न करूया आणि हा प्रश्न सोडवून घेऊया, तसेच आपली इच्छा प्रबळ आहे हे दाखविण्यासाठी मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या मूक फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक राजू बिर्जे यांनी केले.
सोशल मीडियावर युवकांनी भडकावू पोस्ट न करता, लोकशाही मार्गाने युवक आणि महिलांनी सामील व्हावे आणि मोठ्या संख्येने जनजागृती करावी असे आवाहन संतोष कृष्णाचे यांनी केले.
यावेळी अश्वजित चौधरी, सुरज चव्हाण, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे, आकाश भेकणे यांनी विचार मांडले
उपाध्यक्ष गुंडू कदम पदाधिकारी सुरज कुडुचकर, महेश जाधव, सुरज चव्हाण, सौरभ तोंडले, गजानन बैलूरकर, महेश चौगुले, निखिल देसाई, उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक मांडले तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *