Friday , November 6 2026
Breaking News

बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्षवेधी पथसंचलन

Spread the love

 

हजारो स्वयंसेवकांचा सहभाग; नागरिकांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत

बेळगाव : दसरा सणाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी सायंकाळी बेळगाव शहरात शिस्तबद्ध आणि लक्षवेधी पथसंचलन केले. पारंपरिक वेशभूषेतील हजारो स्वयंसेवकांच्या या संचलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिस्त, एकता आणि संघभावनेचे दर्शन घडविणाऱ्या या संचलनामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरदार हायस्कूलच्या मैदानावर स्वयंसेवक एकत्र आल्यानंतर पथसंचलनाला सुरुवात झाली. कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल, शनिवार खूट आणि काकतीवेस या प्रमुख मार्गांवरून संचलन मार्गस्थ झाले. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पावलांनी आणि एकतेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.

पथसंचलनाच्या अग्रभागी असलेल्या जीपमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिव गोळवलकर यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या पथसंचलनातून स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संघटनशक्तीचे दर्शन घडविले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *