Friday , November 6 2026
Breaking News

उत्तराखंडच्या चारधाममध्ये धामणेच्या युवकांकडून काळा दिन; सीमाप्रश्न सुटण्यासाठी देवाला साकडे!

Spread the love

 

‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणांनी चारधाम परिसर दुमदुमला

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याची आठवण जागवण्यासाठी १ नोव्हेंबर या काळ्या दिनानिमित्त धामणे येथील युवकांनी उत्तराखंडमधील चारधाम मंदिर परिसरात काळा दिन पाळला.

यावेळी युवकांनी काळा दिन पाळत ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा दिल्या. उत्तराखंडच्या पवित्र चारधाम क्षेत्रातही सीमाप्रश्नाचा आवाज पोहोचवत युवकांनी मराठी भाषिकांच्या भावना व्यक्त केल्या.

तसेच मंदिरात दर्शन घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, यासाठी देवाला साकडे घालण्यात आले.

यावेळी विजय बाळेकुंद्री, शिवाजी चौगुले, दशरथ बाळेकुंद्री, प्रकाश बाळेकुंद्री, लक्ष्मण बाळेकुंद्री आणि दीपक बाळेकुंद्री आदी युवक उपस्थित होते.

उत्तराखंडच्या भूमीतही सीमाप्रश्नाच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘जय महाराष्ट्र’च्या जयघोषात युवकांनी मराठी अस्मिता आणि संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *