Sunday , November 22 2026
Breaking News

रेणुका यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणावर महादेव कोळी यांची निवड

Spread the love

 

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनातून खानापूर तालुक्याला राज्यस्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लक्केबैल येथील रहिवासी तथा खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष महादेव कोळी यांची कर्नाटक सरकारच्या रेणुका यल्लम्मा देवी मंदिर विकास प्राधिकरणावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. एआयसीसीच्या राष्ट्रीय सचिव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनातून झालेल्या या निवडीमुळे खानापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर हे कर्नाटकासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्याला गती देण्याच्या दृष्टीने मंदिर विकास प्राधिकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

महादेव कोळी यांनी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्राधिकरणावर निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे खानापूर तालुक्याला राज्यस्तरीय प्राधिकरणावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून, मंदिराच्या विकासकामांमध्ये तालुक्याचा सहभाग वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महादेव कोळी यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ज्योती सेंट्रलचा फुटबॉलपटू ध्यानेश राज्यात अव्वल

Spread the love    बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *