






कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे 42 वे कडोली मराठी साहित्य संमेलन एकूण चार सत्रात रंगणार आहे. रविवार दि. 10 जानेवारी 2027 रोजी हे साहित्य संमेलन होईल.
मराठी साहित्य संघाची बैठक सोमवारी (ता. 9) रात्री संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात उदघाट्न समारंभ व अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात व्याख्यान व तिसऱ्या सत्रात कविसंमेलन रंगणार आहे. चौथ्या व शेवटच्या सत्रात प्रबोधन आणि करमणूक असा दुहेरी संगम साधणारा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
बैठकीत संमेलनाचे अध्यक्ष, व्याख्याते, कवी यांच्या नावांची चर्चा झाली. साहित्यिकांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. संघातर्फे डिसेंबर महिन्यात घेतल्या जाणाऱ्या “काव्यतरंग ” कविसंमेलनाचीही चर्चा यावेळी झाली.
यावेळी बसवंत शहापूरकर, बाबुराव गौन्डवाडकर, अरुण पाटील, भरमाणी डोंगरे, शिवाजी कुट्रे, विलास बामणे, किरण पवार, सुनील पाटील, तानाजी कुट्रे, दीपक होनगेकर, संभाजी पवार, किशोर पाटील आदींनी विविध सूचना मांडल्या.
सुरुवातीला संघाचे उपाध्यक्ष शिवराज कालकुंद्रीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गिरीधर गौन्डवाडकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta