Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगावकडे येणाऱ्या लष्करी हेलिकॉप्टरचे हावेरीत आपत्कालीन लँडिंग

Spread the love

 

तांत्रिक बिघाडामुळे शेतात उतरवले; सहा जण सुरक्षित

बेळगाव : बेळगावकडे येत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे हावेरी जिल्ह्यातील शिगाव तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. कामनहळ्ळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगत असलेल्या शेतात वैमानिकाने हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून हेलिकॉप्टरमधील सहाही जण सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ZD 4050 क्रमांकाचे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर तामिळनाडूमधील सुलूर येथून बेळगावच्या दिशेने येत होते. प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने शिगाव तालुक्यातील कामनहळ्ळी गावाजवळील शेतात आपत्कालीन लँडिंग केले.

हेलिकॉप्टरमध्ये दीपक शर्मा यांच्यासह हवाई दलाचे एकूण सहा कर्मचारी होते. सर्वजण सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

राष्ट्रीय महामार्गालगत हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिळताच कामनहळ्ळी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच शिगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *