Sunday , November 22 2026
Breaking News

“कॅपिटल-वन” एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला वेळापत्रक जाहीर

Spread the love

 

बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि २२/११/२०२६ पासून रविवार दि. २७/१२/२०२६ या कालावधीत दर रविवारी सकाळी ठीक ८.१५ ते १२.०० या वेळेत भरविण्यात येणार आहेत.

सदर व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवार दि. २२/११/२०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता ज्योती महाविद्यालयातील सभागृहात संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. असे संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी कळविले आहे.

एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला वेळापत्रक पुढीलप्रमाणे….

संस्थेकडे, शाळा मुख्याध्यापकांनी केलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनींच्या नोंदणी प्रमाणे बहुसंख्य विद्यार्थी या व्याखानमालेचा लाभ घेणार असून सर्व विद्यार्थी वर्गानी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *