Sunday , November 22 2026
Breaking News

केएसआरटीसीच्या सामान वाहतूक शुल्कात वाढ नाही

Spread the love

 

प्रत्येक प्रवाशाला २० किलोपर्यंतचे वैयक्तिक सामान विनाशुल्क नेता येणार; महामंडळाकडून अफवांचे खंडन

बेळगाव : बस प्रवासाच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामान वाहतूक शुल्कातही नव्याने वाढ करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या चर्चांना महामंडळाने पूर्णविराम दिला असून, सामान वाहतूक शुल्कासंदर्भात कोणतेही नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येक प्रवाशाला सोबत २० किलोपर्यंतचे वैयक्तिक सामान विनाशुल्क नेता येणार आहे.

राज्यात ७ नोव्हेंबरपासून बस प्रवास भाड्यात २३ टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे. त्याचवेळी बस पास आणि सामान वाहतुकीच्या शुल्कातही सुधारित दर लागू झाल्याची चर्चा होती. मात्र, सामान वाहतूक शुल्काबाबत नव्याने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून, यापूर्वी लागू असलेली नियमावली कायम असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

त्यानुसार, प्रवाशांना स्वतःसोबत २० किलोपर्यंतचे वैयक्तिक सामान कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता नेता येणार आहे. मात्र, निर्धारित वजनमर्यादेपेक्षा अधिक सामान असल्यास अतिरिक्त वजनानुसार प्रचलित नियमावलीप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे.

सामान वाहतूक शुल्कात नव्याने वाढ झाल्याच्या चर्चांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महामंडळाने अधिकृत स्पष्टीकरण देत या चर्चांचे खंडन केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता महामंडळाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणात तामिळनाडूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी फेटाळली

Spread the love  बेळगाव : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या वादात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *