Sunday , November 22 2026
Breaking News

डीएससीमध्ये माजी सैनिकांसाठी भरती मेळावा; १ व २ डिसेंबरला बेळगावात आयोजन

Spread the love

 

बेळगाव : डीएससी (डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स) मध्ये भरतीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे दि. १ ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरती मेळाव्यात मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित लष्करातील माजी सैनिक तसेच प्रादेशिक सेना (टीए) मधील कर्मचाऱ्यांनाच सहभागी होता येणार आहे. यामध्ये सैनिक जनरल ड्युटी आणि सैनिक क्लर्क या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
पुनर्नियुक्तीसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
सैनिक जनरल ड्युटी पदासाठी माजी सेवेतून निवृत्त झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे आवश्यक आहे.
सैनिक क्लर्क पदासाठी निवृत्तीनंतर पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे आवश्यक आहे. सैनिक जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराचे वय भरतीच्या दिवशी ४६ वर्षांपेक्षा कमी असावे.
सैनिक क्लर्क पदासाठी उमेदवाराचे वय भरतीच्या दिवशी ४८ वर्षांपेक्षा कमी असावे. डीएससीमध्ये सैनिक जनरल ड्युटी आणि सैनिक क्लर्क पदांसाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *