Sunday , November 22 2026
Breaking News

सिंगिनकोपमधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

Spread the love

 

तहसीलदारांना गावकरी, युवक संघ व शाळांच्या वतीने निवेदन

सिंगिनकोप : येथील गायरान सर्व्हे क्रमांक ४ मधील १०.२२ एकर जागेवर असलेल्या सार्वजनिक सुविधांच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात खानापूरचे तहसीलदार यांना सिंगिनकोप गावकरी पंचमंडळी, स्वामी विवेकानंद युवक संघ, सिंगिनकोप तसेच गावातील कन्नड व मराठी शाळांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

सदर गायरान जमिनीमध्ये हिंदू स्मशानभूमी, तलाव, शाळेसाठी राखीव जागा तसेच गावातील मुलांना व युवकांना खेळण्यासाठी क्रिकेट मैदान उपलब्ध आहे. मात्र, या मैदानासह राखीव जागेच्या काही भागात अतिक्रमण झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वापरासाठी असलेली जागा सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गावाच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने स्मशानभूमी, तलाव, शाळेसाठी राखीव जागा आणि क्रिकेट मैदानाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. प्रशासनाने या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी गर्लगुंजीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, रामानंद पाटील, नागेश पाटील, प्रशांत कुंभार, बापूजी कुंभार, अनिरुद्ध कुंभार, परशराम पाटील, महेश पाटील, सतीश कुंभार, महादेव देसाई, अजय कुंभार, राम कुंभार, ज्ञानेश्वर तारीहाळकर, सचिन कुंभार, विशाल कुंभार, ओमकार पाटील, यल्लाप्पा कुंभार, प्रथमेश कुंभार, साहिल कुंभार, प्रेमानंद पाटील, श्याम तारीहाळकर, योगेश कुंभार, शिवानंद तिरकंनवर, नयन कुंभार, बसवराज पाटील, प्रकाश कोलकार, विठ्ठल पाटील आणि सागर कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *