Sunday , November 22 2026
Breaking News

खानापुरात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाचा दुसरा टप्पा उत्साहात

Spread the love

 

पक्ष संघटन बळकटीकरणासह नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर चर्चा

खानापूर : खानापूर येथील शिवस्मारकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित संघटन सृजन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह आगामी काळातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीला पक्ष निरीक्षक शाकीर सनदी, बडिगेर, रशीद चिकोडी तसेच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बसवराज शिगावी उपस्थित होते.

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रियाज पटेल, बसाप्पा बसट्टी, गौसलाल पटेल, रमेश गौड पाटील, संगाप्पा वाळी, आर. डी. हंजी, संतोष हंजी, काशिम हट्टीहोळी, दशरथ बनोशी, बेन्नी पिंटो यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सावित्री मादार, दीपा पाटील, वैश्णवी पाटील, अनिता दंडगल, सक्कुबाई पाटील, भारती पाटील तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकारीही बैठकीत सहभागी झाले होते.

महादेव कोळी यांचा सत्कार

राज्य सरकारने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष महादेव कोळी यांची रेणुका यल्लम्मा देवी विकास प्राधिकरणावर नियुक्ती केल्याबद्दल बैठकीत त्यांचा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

संघटन बळकटीकरणावर चर्चा

काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, संघटनात्मक कामांना गती देणे आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. तालुक्यातील अनेक इच्छुक नेत्यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्यांसाठी आपले अर्ज सादर केले. यावेळी पक्ष निरीक्षकांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते व सूचना जाणून घेतल्या.

कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सर्व मतांचा विचार करून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि डॉ. अंजलीताई योग्य निर्णय घेतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता करू नये. पक्षाच्या हिताला प्राधान्य देत सर्वांना न्याय देणारा निर्णय घेतला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *