Sunday , November 22 2026
Breaking News

जायंट्सने साजरी केली दिवाळी निराधार झोपडपट्टीवासियासमवेत

Spread the love

 

बेळगाव : गेले चार दिवस दिवाळीचा मोसम, प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली, वर्षभरात आनंद आणि उत्साह घेऊन जाणारा हा सण गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना आपापल्या परीने साजरा करण्याची संधी मिळते. पण काही लोक असे असतात की त्यांना दिवाळी असो अथवा दसरा, त्यांना ना घर ना दार, अशा अनेक कुटुंबांची दिवाळी ही रोजच्या दिवसाप्रमाणेच असते.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण शिंदे यांनी यावर्षी ही दिवाळी अशा निराधार लोकांसमवेत साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी रात्री भरपूर फराळ आणि कपडे घेऊन अनेक सदस्या समवेत ते पोहचले माडीगुंजी जवळील जंगल विभागात ज्या ठिकाणी अनेक आदिवासी सारखे लोक झोपडपट्टीमध्ये निवास करून आहेत.
तिथे त्यांनी लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि चकली अशा पाच प्रकारच्या फराळांची 50 पाकीटे तयार केली, अनेक सभासदांनी दिलेले चांगल्या प्रतीचे कपडे साड्या सोबत घेतल्या आणि ते तिथे पोहोचले.
तिथल्या गरजू पुरुषांना शर्ट पॅन्ट, स्त्रियांना साड्या, कुटुंबप्रमुखांना फराळ आणि मेणबत्त्याची वाटप केले. जायंट्स सदस्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेले हे काम पाहून अनेकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. यावेळी सर्वश्री मधु बेळगावकर, प्रेमानंद गुरव, प्रदीप चव्हाण, आकाश लाटूकर आणि प्रकाश तांजी हे उपस्थित होते. त्यानंतर या सभासदांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन तिथेही असलेल्या गरजूंना या वस्तूंचे वाटप केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *