Sunday , November 22 2026
Breaking News

मच्छे येथे गाव मर्यादित भव्य सामान्यज्ञान परीक्षा १५ नोव्हेंबरला

Spread the love

 

मच्छे :  श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने आयोजित गाव मर्यादित भव्य सामान्य ज्ञान परीक्षा २०२६-२७ रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सरकारी मराठी प्राथमिक शाळा, मच्छे येथे होणार आहे.

या परीक्षेचे हे दुसरे वर्ष असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, सामान्य ज्ञानाची जिज्ञासा आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा दोन विभागांत घेण्यात येणार आहे. प्राथमिक विभागात इयत्ता ३ री ते ७ वी, तर माध्यमिक विभागात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. परीक्षा ५० गुणांची असून, त्यासाठी १ तास १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. शिवचरित्र, मराठी व्याकरण, इतिहास व भूगोल, विज्ञान तसेच माध्यमिक विभागासाठी गणित या विषयांचा परीक्षेत समावेश असेल.

पारितोषिकांचे स्वरूप 

प्राथमिक विभाग :
– प्रथम क्रमांक – २,००० रुपये रोख व पारितोषिक
– द्वितीय क्रमांक – १,५०० रुपये
– तृतीय क्रमांक – १,१०० रुपये

माध्यमिक विभाग :
– प्रथम क्रमांक – ३,००० रुपये रोख व पारितोषिक
– द्वितीय क्रमांक – २,२०० रुपये
– तृतीय क्रमांक – १,५०० रुपये

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क केवळ २० रुपये असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२६ आहे. मच्छे गावातील विद्यार्थ्यांनी या ज्ञानवर्धक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
– श्री. विनायक चौगुले – ७०२६०११६०७
– श्री. गजानन छप्रे – ९७३१७९४७४६
– श्री. सुशील धामणेकर – ९९०२१३०५३५

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *