






सौंदलगा गावातील धक्कादायक घटना; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
बेळगाव : माणुसकीला काळिमा फासणारी घटना निपाणी तालुक्यातील सौंदलगा गावात उघडकीस आली आहे. जन्माला आलेल्या एका नवजात पुरुष जातीच्या बालकाला निर्दयी व्यक्तींनी कचऱ्यासारखे फेकून दिल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने हे बालक जिवंत अवस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून बालकाला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
नवजात बालकाला अशा प्रकारे उघड्यावर सोडून देण्याच्या या अमानुष प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. बालकाला कोणी आणि कोणत्या कारणामुळे सोडून दिले, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta