






बेळगाव : येत्या २ डिसेंबरपासून बेळगावमध्ये सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या महामेळाव्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक दुपारी ३.३० वाजता खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे होणार आहे. या बैठकीत आगामी महामेळाव्याच्या आयोजनासह त्याच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta