Sunday , November 22 2026
Breaking News

सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये बालदिन उत्साहात साजरा

Spread the love

 

 

शहापूर : येथील सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये १४ नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणपत पाटील होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. गणपत पाटील म्हणाले की, बालकांना योग्य मार्गदर्शन आणि चांगले संस्कार मिळाल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच संस्कार आणि प्रोत्साहन देणेही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, संतोष होंगल, पैलवान मारुती घाडी, हिरालाल चव्हाण, कणबरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, बालक आणि पालकांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष होंगल यांनी केले, तर हिरालाल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *