






बेळगाव : गोकाक-बेळगाव मार्गावरील मुचंडी गावाजवळ अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला मारीहाळ पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी पाच लिटर दारू जप्त केली असून, तिची किंमत सुमारे एक हजार रुपये आहे.
१४ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मारीहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय बी. एस. नायक आणि त्यांच्या पथकाने मुचंडी परिसरात छापा टाकला. यावेळी पुलकेशी गल्ली, मुचंडी येथील रवी बसवन्नी गुडडाईकोगोळ (वय ५४) हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
छाप्यादरम्यान प्लास्टिकच्या कॅनमध्ये साठवून ठेवलेली पाच लिटर दारू जप्त करण्यात आली.
याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६४/२०२६ नुसार कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ मधील कलम ३२ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी पीएसआय बी. एस. नायक व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta