






बेळगाव : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोटारसायकल चोरीच्या तयारीत संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या एका तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली. शनिवारी रात्री ८.२५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
प्रदीपकुमार श्रीराम चन्ने (वय ३२, मूळ गाव मूलाल हुलकापूर, कन्नौज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या बेळगावातील गांधी नगर येथील लक्ष्मी गल्लीमध्ये वास्तव्यास होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मध्यवर्ती बसस्थानकाच्या कंपाऊंड भिंतीजवळ लपून बसला होता. सार्वजनिक ठिकाणी उभी असलेली मोटारसायकल चोरण्याच्या उद्देशाने तसेच आपली ओळख लपवून सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी गुन्हा करण्याच्या तयारीत तो असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
दरम्यान, गस्तीवर असलेल्या मार्केट पोलिसांनी त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा कलम ९६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta