Sunday , November 22 2026
Breaking News

लोकमान्य ग्रंथालय साहित्य पुरस्कार जाहीर

Spread the love

 

बेळगाव : लोकमान्य ग्रंथालयातर्फे या वर्षापासून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साहित्य पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात येत आहे.

बेळगाव आणि परिसरातील वेगवेगळ्या प्रकारात साहित्य निर्मिती करणाऱ्या विविध लेखकांचा आढावा घेऊन निवड समितीने या प्रथम वर्षाच्या पुरस्कारासाठी प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. शोभा नाईक, प्रा. द. तु. पाटील आणि श्रीमती पूजा भडांगे यांची निवड केली आहे.

सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य ग्रंथालय टिळकवाडी येथे हे पुरस्कार सन्मानपूर्वक दिले जाणार आहेत. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

नाशिकचे थोर विचारवंत आणि ज्येष्ठ संपादक, लेखक डॉ. रमेश वरखेडे यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. या वेळी सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. मंगला वरखेडे याही उपस्थित राहतील. तरी सर्व साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोकमान्य ग्रंथालयातर्फे करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *