






बेळगाव : रविवार दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी कर्नाटक राज्याचे माननीय शिक्षण मंत्री श्री. मधु बंगारप्पा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटी दरम्यान सर्वप्रथम शिक्षण मंत्री श्री. मधु बंगारप्पा यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बेळगाव जिल्हा अनुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. एस एस मठद, श्री. मलगौडा, श्री. ईश्वर बिरादार मुडलगी, श्री. बसवराज कुकडोळी, श्री. पी डी पाटील उपस्थित होते.
ह्या भेटी दरम्यान उपस्थित शिक्षकांनी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या समस्या शिक्षण मंत्र्यांसमोर मांडल्या. या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी 1995 ते 2000 पर्यंतच्या विनाअनुदानित शाळांना लवकरात लवकर अनुदान देण्याची ग्वाही दिली. शाळा नूतनीकरणाच्या स्थगित असलेल्या कामांना देखील लागलीच सुरुवात होईल अशी आशा व्यक्त केली. तसेच 2016 ते 2020 पर्यंतच्या रिक्त जागांना रितसर सुरुवात झाली असून जुन्या पेन्शन योजनेला चालना देण्याचे कार्य देखील सुरू आहे असे मत मांडले.
या सत्कार प्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातील सहशिक्षक श्री. एम पी कंग्राळकर, श्री. एम एम मंत्रेशी, श्री. जी एन नाकाडी व श्री. रोहित पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta