Sunday , November 22 2026
Breaking News

शहापुरात २९ नोव्हेंबरला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे नेते रमाकांत दादा कोंडुस्कर यांच्या वतीने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शहापूर येथील श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली, गाडेमार्ग येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी आजरा-गडहिंग्लज परिसरातील प्रसिद्ध ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मिलन डिसूजा विशेष उपस्थित राहणार आहेत. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

महिलांना आपल्या कला-गुणांना वाव देण्याची आणि मनोरंजनाची संधी मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेचा जागर करणाऱ्या या उपक्रमात महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सागर पाटील, प्रशांत भतकांडे, राजेंद्र बिरजे, सूरज चव्हाण आणि विशाल कंग्राळकर यांच्याशी ९९६४७७७५६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *