






देखभाल-दुरुस्तीसाठी हेस्कॉमचा निर्णय; सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत वीज खंडित
बेळगाव : वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी वडगाव येथील ११०/११ केव्ही सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विविध वीजवाहिन्यांचा पुरवठा तब्बल आठ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव, भाग्यनगर, विद्यानगर, अनगोळ, होसूर, सुभाष मार्केटसह शहरातील अनेक वसाहती आणि व्यावसायिक भागांना वीजपुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही वीजकपात करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमतर्फे देण्यात आली आहे.
या नियोजित कामामुळे एफ-७ होसूर, एफ-११ सुभाष मार्केट, एफ-४ बाजार गल्ली, एफ-५ वडगाव, एफ-१२ विद्यानगर आणि एफ-१३ भाग्यनगर या सहा फीडरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
यामध्ये माधव रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली खासबाग, होसूर बसवण्णा गल्ली, उप्पार गल्ली, तुळजाभवानी/तुरचर कॉलनी, शृंगेरी कॉलनी, बाडिवाले कॉलनी, जुना पी. बी. रोड (पॅटसनजवळ), येरमाळ रोड, बालकृष्ण नगर, गवळी गल्ली, पाटील गल्ली, वझे गल्ली, बावळे नगर, अळवन गल्ली, रामदेव गल्ली, दत्ता गल्ली, नेकार कॉलनी, मंगाई नगर, विष्णू गल्ली आणि कलमेश्वर रोड या भागांचा समावेश आहे.
तसेच गुरुदेव मंदिर रोड, धामणे रोड, वाजे गल्ली, तेगिना गल्ली, सपार गल्ली, कल्याण नगर, मलप्रभा नगर, सुभाष मार्केट, घुमटमाळ, सर्वोदय कॉलनी, रानडे रोड, आरपीडी रोड, आर. के. मार्ग पहिला ते सहावा क्रॉस, आनंदवाडी, गणेश कॉलनी, संभाजी नगर, केशव नगर, येळ्ळूर रोड, केएलई परिसर, अन्नपूर्णेश्वरी नगर, आनंद नगर, अनगोळ माळ, नजर कॅम्प, जेल स्कूल, पटवर्धन लेआउट, आदर्श नगर आणि गोमटेश कॉलेज परिसरातील वीजपुरवठाही बंद राहणार आहे.
याशिवाय महालक्ष्मी कॉलनी, ओंकार नगर, विद्यानगर, सन्नड्डी कॉलनी, भाग्यनगर चौथा ते दहावा क्रॉस, पारिजात कॉलनी, अनगोळ-वडगाव रोड, अनगोळ, जेरे गल्ली, आंबेडकर गल्ली, कनकदास कॉलनी, नवहिंद सहकारी संस्था कॉलनी आणि आसपासच्या परिसरांनाही वीजकपातीचा फटका बसणार आहे.
नागरिकांनी पूर्वतयारी करावी
आठ तासांच्या या नियोजित वीजखंडित काळात घरगुती कामे, पाणीपुरवठा, व्यावसायिक व्यवहार तसेच लघुउद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta