Sunday , November 22 2026
Breaking News

मोबाईल हॅक करून शिक्षकाला लाखाचा गंडा; खात्यातून १ लाख ३८ हजार रुपये लंपास

Spread the love

 

‘एक्सटी टीव्ही’ ॲपच्या माध्यमातून सायबर चोरट्यांचा डाव; बेळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बेळगाव : मोबाईलमध्ये ‘एक्सटी टीव्ही’ नावाचे ॲप डाऊनलोड झाल्यानंतर मोबाईल हॅक करून एका शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ३८ हजार ४७७ रुपये परस्पर वळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुराज (वय ४१, रा. कुलगोड) यांच्याबाबत १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी बेळगाव सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, गुरुराज यांचे गोकाक येथील एका बँकेत खाते असून त्याला मोबाईल क्रमांक जोडलेला आहे. ते ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी फोन-पेचा वापर करतात. १४ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर ‘एक्सटी टीव्ही’ नावाचे ॲप दिसून आले. त्यानंतर काही वेळातच मोबाईल हॅक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, १५ आणि १६ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण १ लाख ३८ हजार ४७७ रुपये वळविण्यात आले. खात्यातील रक्कम परस्पर कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवहारांची माहिती घेतली.

याप्रकरणी गुरुराज यांनी १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदविली होती. हेल्पलाईनवर तक्रार केल्यामुळे पोलिसांकडेही तक्रार नोंद झाली असेल, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार देण्यास विलंब झाला. अखेर त्यांनी बेळगाव सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *