Sunday , November 22 2026
Breaking News

खानापूर-गर्लगुंजी बस वेळेत सोडा; रविवारी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Spread the love

 

खानापूर : खानापूर आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेत सोडाव्यात तसेच रविवारी बंद करण्यात आलेली बेळगाव-गर्लगुंजी बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी गर्लगुंजी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात खानापूर बस आगाराचे व्यवस्थापक संतोष यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या १५ दिवसांपासून सकाळी ९ वाजताची बस खानापूरला वेळेत पोहोचत नसल्याने गर्लगुंजी, निडगल, भांडरगाळी आणि बरगाव येथील शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला तास बुडत आहे. शाळांमध्ये ऑनलाइन उपस्थिती नोंदवली जात असल्याने विद्यार्थ्यांना याचा नाहक फटका बसत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच्या सर्व बसफेऱ्या निर्धारित वेळेत सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत रविवारी बंद करण्यात आलेली बेळगाव-गर्लगुंजी बससेवा पुन्हा नियमित सुरू करावी आणि खानापूर-बेळगाव आगाराच्या सर्व बसेस वेळेत सोडाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर आगार व्यवस्थापक संतोष यांनी बेळगाव आगार तसेच डीटीओ यांच्याशी संपर्क साधला. रविवारी बससेवा सुरळीत करण्यासह खानापूरच्या बसेस वेळेत सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी गर्लगुंजीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, परशराम कोलकार, सदानंद कुंभार, अजय कोलकार, रोहित नावलगी, परशराम बेळगावकर आणि संतोष नाईक उपस्थित होते.

विद्यार्थी आणि नागरिकांना यापुढे बससेवेमुळे त्रास झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा प्रसाद पाटील यांनी आगार व्यवस्थापकांना दिला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *