Sunday , November 22 2026
Breaking News

कार्तिक पौर्णिमेनिमित्त भोई गल्लीतील कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी खुले

Spread the love

 

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील बेळगाव शहरातील भोई गल्ली येथे श्री कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर असून, कार्तिक पौर्णिमेनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

परंपरेनुसार कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला कृतिका नक्षत्र असताना श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या दिवशी दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.

यंदा सोमवार, दि. २३ रोजी उत्तररात्र २.१५ वाजता सुरू होत आहे. त्यानिमित्त मंगळवार, दि. २४ रोजी पहाटे ६ ते रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुले ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. भाविकांनी या पर्वणीचा लाभ घेऊन श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *