Sunday , November 22 2026
Breaking News

कार आणि बोलेरोच्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू; एक गंभीर

Spread the love

 

चिक्कबळ्ळापूर : कार आणि बोलेरो वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर नंदीगिरीधाम पोलीस ठाण्यासमोर घडली.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत तरुणांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणात तामिळनाडूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी फेटाळली

Spread the love  बेळगाव : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या वादात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *