Sunday , November 22 2026
Breaking News

पिण्याच्या पाण्याची टंचाई टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love

 

जुलै २०२७ पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश; जनावरांसाठी चारा बँक सुरू करण्याची तयारी

बेळगाव : मलप्रभा जलाशयात सध्या ४९.५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, जुलै २०२७ पर्यंत नागरिक आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी योग्य कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जलाशयातील उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठी प्राधान्याने वापर करावा, पाण्याची मागणी अचूकपणे निश्चित करून महाराष्ट्रातून आवश्यक पाणी मिळविण्यासाठी नियोजन करावे, तसेच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनधिकृत पंपसेटचे वीजजोड तोडण्याची कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यास ग्रामपंचायतींच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. गरज पडल्यास अतिरिक्त टँकर उपलब्ध करण्यासाठी आगाऊ निविदा प्रक्रिया सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.

येत्या काळात जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिस्थितीनुसार चारा बँक सुरू करण्याची तयारी ठेवावी आणि चारा पुरवठ्यासाठी आधीच निविदा मागवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणी आणि चारा टंचाई उद्भवू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी रोहित सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *