






बेळगाव : २०२६ सालच्या प्रतिष्ठित ‘सहकार रत्न’ पुरस्कारासाठी बेळगाव विभागातून निवड झाल्याबद्दल श्री. दिगंबर एस. पवार यांचा आज, गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
समस्त चव्हाट गल्ली नागरिकांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा सत्कार समारंभ गुरुवारी सायंकाळी ७ वाजता चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयात होणार आहे.
या गौरव सोहळ्यास चव्हाट गल्लीतील तसेच बेळगाव शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिगंबर पवार यांचे अभिनंदन करावे, असे आवाहन समस्त चव्हाट गल्ली नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta