Sunday , November 22 2026
Breaking News

निंबाळकर दांपत्यांनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट

Spread the love

खानापूर : गेल्या पाच-सहा महिन्यांपासून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या पक्ष संघटनेच्या कामानिमित्त सातत्याने दौऱ्यावर होत्या. गोवा, दिल्ली, हैदराबाद अशा विविध ठिकाणी पक्षाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांना मुख्यमंत्री डी के. शिवकुमार यांची निवांत भेट घेता आली नव्हती. दरम्यान, वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची नव्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर निंबाळकर दांपत्याने मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री डी के शिवकुमार हे नव्या शासकीय निवासस्थानी वास्तव्यास गेल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

गेल्या काही महिन्यांत सरकार आपले असूनही अनेक गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत. मात्र, कोणतीही नाराजी व्यक्त न करता किंवा सरकारविरोधात भूमिका न घेता डॉ. निंबाळकर यांनी संयमाने पक्ष संघटनेचे काम सुरू ठेवले. परिस्थिती कशीही असली तरी पक्षनिष्ठा जपत आपले काम प्रामाणिकपणे करत राहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. निंबाळकर पक्षकामात व्यस्त राहणार आहेत. गोव्याची निवडणूक संपल्यानंतर खानापूर तालुक्यात पुन्हा जोमाने पक्ष संघटनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांच्या तयारीला कार्यकर्त्यांनी आतापासूनच लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *