Sunday , November 22 2026
Breaking News

भाजप महिला मोर्चाच्या विशेष बैठकीत डॉ. सोनाली सरनोबत यांचा सहभाग

Spread the love

 

राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा खासदार रूपाकुमारी चौधरी यांचे आगामी निवडणुका आणि संघटनात्मक रणनीतीविषयी मार्गदर्शन

बेंगळुरू : येथील भाजपच्या राज्य मुख्यालयातील जगन्नाथ भवन येथे कर्नाटक भाजप महिला मोर्चाची विशेष संघटनात्मक बैठक राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा कु. सी. मंजुळा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव महिला मोर्चाच्या प्रतिनिधी डॉ. भस्मे आणि सौ. शिल्पा केकरे यांच्यासह सहभाग घेतला.

महिला खासदार आणि आमदारांसाठी आयोजित कॉमनवेल्थ कार्यक्रमानिमित्त बेंगळुरू येथे आलेल्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा खासदार सौ. रूपाकुमारी चौधरी यांनी या बैठकीला उपस्थित राहून महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बेळगाव महिला मोर्चाच्या वतीने त्यांचे आत्मीय स्वागत करून सन्मान करण्यात आला.

आगामी निवडणुकांची पूर्वतयारी, महिला मोर्चाच्या कार्ययोजना आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मार्गदर्शन करताना खासदार रूपाकुमारी चौधरी यांनी निवडणुकीची प्रभावी रणनीती आखणे, पक्षाची संघटनात्मक रचना तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला.

संघटनेतील शिस्त, सामूहिक नेतृत्व, परस्पर समन्वय, प्रभावी संवाद आणि जनसंपर्क यांचे महत्त्व अधोरेखित करताना भाजपची धोरणे, विकासकामे आणि जनकल्याणकारी योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यात महिला मोर्चाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. महिला कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आणि जबाबदारीच्या भावनेतून कार्य करून पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा कु. सी. मंजुळा यांनी बूथ स्तरावर संघटना मजबूत करणे, महिलांशी सातत्याने संपर्क ठेवणे, पक्षाचे कार्यक्रम आणि विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच जिल्हा व मंडळ स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याची आवश्यकता व्यक्त केली.

यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनातून राज्य आणि जिल्हा स्तरावर कार्य करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

या बैठकीतील बेळगाव महिला मोर्चाच्या प्रतिनिधींचा सहभाग आगामी पक्षीय कार्यक्रम आणि निवडणुकीच्या तयारीत सक्रिय योगदान देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. बैठकीमुळे महिला पदाधिकाऱ्यांमध्ये संघटनात्मक बांधिलकी, एकजूट आणि सामूहिकपणे कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याचे सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *