






बेळगाव : कर्नाटक स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मल्लेश आन्ना चौगुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बेळगाव जिल्ह्याच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव महांतेश कोळूचे, तुलसीदास जोशी, विलास नंदी, नागेंद्र पाखरे, संभाजी हिंडलगेकर, प्रभाकर अक्नोजी, चन्नबस्साप्पा टोपी आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मल्लेश चौगुले यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Belgaum Varta Belgaum Varta