Sunday , November 22 2026
Breaking News

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध परिसरात ३० दिवस जमावबंदी

Spread the love

 

 

पुणे-बेंगळूर महामार्गावरील संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा आदेश

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध परिसरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. विविध संघटनांकडून होणारी आंदोलने, धरणे आणि निदर्शनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सुवर्ण विधानसौधपासून दोन किलोमीटरच्या परिसरात तब्बल ३० दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने आंदोलन करतात. या आंदोलनांमुळे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या संभाव्य परिस्थितीचा विचार करून २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत सुवर्ण विधानसौधपासून दोन किलोमीटरच्या परिघात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावे आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, हा या आदेशामागील प्रमुख उद्देश आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *