Sunday , November 22 2026
Breaking News

उत्कर्ष महिला मंडळातर्फे आनंदनगर येथे कार्तिक दीपोत्सव उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथील उत्कर्ष महिला मंडळातर्फे गुरुवारी आनंदनगर येथील शिवमंदिर, पहिला क्रॉस येथे कार्तिक दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत पूजन केले. त्यानंतर मंदिर परिसरात आकर्षक दिव्यांची आरास करून संपूर्ण परिसर उजळून टाकण्यात आला. दीपप्रज्वलनामुळे मंदिर परिसर भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाने भारावून गेला.

यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध भावगीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. दीपोत्सव आणि भावगीतांच्या सुरेल मैफलीमुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम आनंदी आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी मंडळाच्या सर्व पदाधिकारी तसेच सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *