Saturday , November 7 2026
Breaking News

पाणी वाचवा जीव वाचवा स्केटिंग रॅली

Spread the love

बेळगाव : पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 8 मे 2022 रोजी गोवावेस स्विमिंग पूल ते टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली.

4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. रॅली पाणी वाचवा जीव वाचवा, जल है तो कल है, पाणी बचाओ जीवन बचाओ माती वाचवा या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीला डॉ. माधव प्रभू अध्यक्ष प्यास फाउंडेशन, जी.टी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिनकर अमीन, श्रीधन मलिक, गणेश गुंडप, नगरसेवक राजू भातकांडे, राजू माळवदे, माजी फेड जायंट्स इंटरनॅशनल अध्यक्ष, अभिमन्यू डागा, तानाजी शिंदे, एम गंगाधर, महेश आंब्रोळे, अजित तडकोळ, प्रवीण त्रिवेदी, श्रीधर भस्मे, विजय खोत, सूर्यकांत हिंडलगेकर, राहुल टक्कर आणि त्यांची टीम ईशा फाउंडेशन आणि सद्गुरू पालक आणि स्केटिंगपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅली यशस्वीरित्या संपल्यानंतर सर्व सहभागींना डॉ. माधव प्रभू, राजू माळवदे, श्रीधन मलिक, अभिमन्यू डागा आदींच्या हस्ते कौतुक प्रमाणपत्र देण्यात आले.

ही रॅली यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, शुभम साखे, सागर चौगुले, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सतीश पाटील, साई समर्थ अंजना, चिन्मय देसाई, नितीन कुदळे यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *