बेळगाव : तिसाव्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आणि उल्लेखनीय प्रगती साधलेल्या अनगोळ रोडस्थित आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी सोसायटीचे संचालक ए. एल. गुरव यांची तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निरोप देण्याचा आणि नूतन पदाधिकार्यांचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी दुपारी संस्थेच्या अनगोळ रोड येथील कार्यालयात संपन्न झाला.
प्रारंभी नूतन पदाधिकार्यांनी मावळते अध्यक्ष दिगंबर राऊळ आणि उपाध्यक्ष एन. आर. सनदी यांचा सत्कार केला. नूतन अध्यक्ष ए. एल. गुरव यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक एस. एम. जाधव यांनी तर उपाध्यक्ष मेलगे यांचा सत्कार दिगंबर राऊळ यांनी केला. त्यानंतर विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी आदर्श सोसायटीचे सर्व संचालक कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.