बेळगाव : राजकारण करत सामाजिक कार्य करणारे अनेक राजकारणी आहेत पण राजकारणाला दुय्यम स्थान देत स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलेले अवलिया म्हणजे मराठा समाजाचे नेते किरण जाधव.
आज 12 जानेवारी रोजी किरण जाधव यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्यासाठी केलेला हा छोटासा लेखनप्रपंच.
किरण जाधव यांचा जन्म 12 जानेवारी 1973. किरण जाधव हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो तो सतत हसतमुख आणि शांत चेहरा. बांधकाम व्यावसायिक असलेले किरण जाधव समाजकार्यात देखील आघाडीवर असतात. विमल फौंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असतात. कोरोना काळात त्यांनी उत्तम प्रकारे जनतेची सेवा केली आहे. कोरोनाबधितांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणे, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप करणे यासारखी कामे विमल फौंडेशनच्या माध्यमातून किरण जाधव यांनी केली आहेत.
नुकतेच बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाला एकत्रित आणून महामेळाव्याचे आयोजन केले. शासन दरबारी मराठा समाजासाठी विविध योजना मंजूर करून घेतल्या. त्याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त विमल फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भव्य अशी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य किरण जाधव यांनी केले आहे. विमल फौंडेशनच्या वतीने रांगोळी स्पर्धा, किल्ला स्पर्धा, घरगुती उत्कृष्ट गणेश मूर्ती व सजावट स्पर्धा संगीत स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. याशिवाय गणेशोत्सव काळात अथर्वशीर्ष पठण व विविध धार्मिक उपक्रम देखील किरण जाधव राबवली आहेत. याशिवाय देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कब्बडी, खो-खो यासारख्या स्पर्धा देखील भरविल्या आहेत. शिक्षण व क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबर जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी संस्कार व संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी विमल फौंडेशनच्या माध्यमातून किरण जाधव यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या अवलियाचा आज 49 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. किरण जाधव यांचे उर्वरित आयुष्य सुखी, समाधानी जावो हीच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा!