बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती व उत्कृष्ट देखावा बक्षीस समारंभ कपिलेश्वर येथील जायंट्स भवनच्या श्री. रामचंद्र तात्या पवार वातानुकूलित सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पाडला यावेळा विजेत्या मंडळांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे अध्यक्ष श्री. अविनाश पाटील, खजिनदार श्री. अनिल चौगुले, प्रमुख पाहुणे सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल शिरोडकर तसेच स्पेशल कमिटी मेंबर श्री. मोहन कारेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. मोहन कारेकर यांनी केले या वेळेला परीक्षक म्हणून काम केलेले श्री. सागर पाटील व श्री. सुमित खनुकर यांचा जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनतर्फे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते उचित सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री सुवर्ण लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, श्री. अनिल चौगुले, श्री. बाळकृष्ण तेरसे, श्री. मल्लिकार्जुन सत्तगिरी, श्री. बी एल मजूकर, श्री. अनिल चौगुले, श्री. प्रकाश अर्कसाली, श्री. दयानंद भेंडेगिरी, श्री. अनंत हावळ, सौंदर्य पेंट्स, श्री. उमेश पाटील, श्री. अरुण काळे, श्री. सुनील भोसले, श्री. भास्कर कदम, विमल इन्फेन प्रायव्हेट लिमिटेड, तसेच जायंट्सचे सभासद श्री सुनील मुतकेकर, श्री. विजय बनसूर, श्री. अशोक हलगेकर, श्री. शिवराज पाटील, श्री. अरविंद देशपांडे श्री. विकास कलघटगी, श्री. जयवंत पाटील, श्री. दिगंबर किल्लेकर यांनी विशेष परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विश्वास पवार यानी केले. आभार विजय बनसूर यानी मानले.