

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपआयुक्तांविरुद्ध परिषदेच्या सभेत ठराव पास होऊनही, त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली न झाल्याने आज बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्यालयात नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले.
बेळगाव महानगरपालिकेचे महसूल उपआयुक्त यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असतानाही, त्यांच्या विरोधात परिषदेच्या सभेत ठराव मंजूर झाला. तरीही त्यांची बदली झाली नाही आणि ते अजूनही सेवेत कार्यरत आहेत. याचा निषेध करत, निवडलेल्या सदस्यांना कोणतीही किंमत राहिलेली नाही, असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या आवारात बसून तीव्र आंदोलन केले.यावेळी बोलताना सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी म्हणले, आम्ही लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत आणि सामूहिक राजीनामा देण्यासंबंधी निवेदन सादर करणार आहोत. बेळगाव महानगरपालिकेला सरकारने योग्य अधिकारी द्यावेत आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची सेवा तात्काळ समाप्त करावी. भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांची बदली न करता ते अजूनही सेवेत कार्यरत आहेत. सरकारकडून निवडलेल्या सदस्यांविरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी सत्ताधारी पक्षाचे अनेक नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta