Sunday , September 20 2026
Breaking News

हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उपस्थिती

Spread the love

 

खानापूर : आज वाल्मिकी जयंती. या जयंतीचे औचित्यसाधून हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या आज सकाळी ११.३० वाजता हबनहट्टी येथे उपस्थित रहाणार असून डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याहस्ते मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. निंबाळकर या आमदार असताना या मंदिरासाठी १२ लाखाचा निधी मंजूर केला होता. तसेच नाईक गल्लीतील सीसी रस्त्यासाठी ५ लाख व ३ लाख असा निधी दिला होता. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून आज दुपारी गोवा मार्गे दिल्लीला रवाना होणार असून उद्या सकाळी गोवा कॉंग्रेसची बैठक एआयसीसी ऑफीस दिल्ली येथे होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *