Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

मागील ४०० रुपयाशिवाय ऊस तोडू देणार नाही

  राजू शेट्टी : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निपाणी (वार्ता) : गतवर्षी एफआरपीवर आधारित ऊस दराची मागणी केली होती. मात्र त्यानंतर बाजारपेठेत साखरेचे दर ३२०० ते ३८०० वर पोचल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रति टन चा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे. याशिवाय इथेनॉल पासूनही कारखान्यांना जादा रक्कम मिळाली आहे. त्यामुळेच …

Read More »

भुरूनकी येथे गांजा विक्री करणाऱ्यास अटक

  खानापूर : खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा विक्री सुरू आहे. नंदगड जवळील भुरूनकी क्रॉस येथे महादेव रामप्पा बेटगेरी नामक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती नंदगड पोलिसांना मिळताच सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीला पोलीस कोठडी …

Read More »

भाजप-धजद युतीला पक्षांतर्गत वाढता विरोध

  दोन्ही पक्षांना दूरगामी परिणामाची भिती बंगळूर : भिन्न विचारसरणीचे दोन पक्ष असलेल्या भाजप- धजद यांच्यातील युतीला विरोध पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात तीव्र विरोध होत आहे. काही आमदार उघडपणे विरोध करत आहेत, तर काही पक्षांतर्गत मतभेद नोंदवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यावर हे मतभेद निर्माण झाल्याने युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी …

Read More »

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बोरगावात गर्भवतीचा मृत्यू

  नातेवाईकांचा आरोप : घेराओ घालून कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांना दवाखान्यासमोर आंदोलन करून डॉक्टरवर कारवाईचा मागणी केली. बोरगाव (ता.निपाणी) येथे ही घटना घडली. शेजल अनिकेत माळी (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मृत्यूला डॉ. महावीर बंकापुरे जबाबदार …

Read More »

महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा रविवारी (८) रोजी ६१ वा वाढदिवस साजरा होत आहे. हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याप्रमाणे येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात श्री गणेश मंडळ व हेल्थ क्लब यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती …

Read More »

कणेरीवाडीजवळील अपघातामध्ये बेनाडीतील दाम्पत्य ठार

  निपाणी (वार्ता) : दुचाकी एक्सल व ट्रॅक्टर यांच्या झालेल्या धडकेमध्ये बेनाडीतील दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याची घटना कनेरीवाडी क्रॉस नजीक गुरुवारी (ता.५) सायंकाळी घडली. संदीप बापूसो कोळी (वय ४०) व राणी संदीप कोळी (वय ३५ रा. बेनाडी, ता. निपाणी) अशी या घटनेतील मयत दाम्पत्यांची नावे आहेत. संदीप व त्यांची पत्नी राणी …

Read More »

गणेबैल टोलनाक्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. भूमिअधिकारण अधिकारी बलराम चव्हाण, प्रांताधिकारी व खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या विषयावर तत्काळ तोडगा काढण्याचे …

Read More »

कर्नाटक करत आहे ‘हिरव्या दुष्काळा’चा सामना

  सिद्धरामय्यांनी केंद्रीय पथकाला सांगितली वास्तव परिस्थिती बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज भेटीला आलेल्या केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाशी चर्चा केली आणि त्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. सरकारने १० सदस्यीय आंतर-मंत्रालयीयन केंद्रीय पथकाला (आयएमसीटी) माहिती दिली की, यावेळी राज्याला ‘हिरव्या दुष्काळा’चा सामना करावा लागत आहे. पीक वाढ आणि …

Read More »

हजार हेक्टरवर होणार शाळूची पेरणी; रब्बी हंगामासाठी बियाणे दाखल

  बियाण्यांच्या दरात दुपटीने वाढ निपाणी (वार्ता) : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र या उलट परिस्थिती झाल्या असून पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. आता तोंडाशी आलेली सोयाबीन व इतर पिके काढण्याची कामे सुरू असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची तयारीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

आर्थिक देवाणघेवाणीवरून राहुलचा खून; दोन आरोपी जेरबंद

  २४ तासात खुनाचा उलगडा निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने येथील हौसाबाई सावंत कॉलनी मधील राहुल उर्फ आनंद शिवाप्पा सुभानगोळ या युवकाचे अपहरण करून त्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) उघडकीस आली होती. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी २४ तासात संशयित आरोपी कौस्तुभ अमोल …

Read More »