सय्यद निजामुद्दीन बुखारी; निपाणीत ईद ए- मिलाद निपाणी (वार्ता) : कोणतेही काम करताना चांगले भावना ठेवून केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. धर्म हा माणसापेक्षा मोठा असून प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे. इस्लाम हा आदर्श जीवन मार्गाचा संदेश देणारा असून त्याचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन सय्यद निजामुद्दीन बुखारी यांनी केले. …
Read More »‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत निपाणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम
निपाणी (वार्ता) : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेतर्फे ३१ वार्डमध्ये स्वच्छता राबविण्यात आली. शहर आणि उपनगरातील काही चौकामध्ये खराटा हातामध्ये घेत सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी – कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा प्रतिसाद लाभला. येथील नगरपालिकेच्या …
Read More »कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक; रुग्णालयात नेताना महिलेचा मृत्यू, तर पती जखमी
बेंगळुरू : कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने शनिवारी (दि.३०) बेंगळुरूमध्ये चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात या कन्नड अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेताना वेगात …
Read More »भाजपशी युतीवर धजद प्रदेशाध्यक्षानीच व्यक्त केली नाराजी
आपल्याशी चर्चा केली नसल्याची खंत; १६ ला घेणार अंतिम निर्णय बंगळूर : एच. डी. कुमारस्वामी हे माझ्यासाठी लहान भावासारखे आहेत. मात्र, त्यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट क्लेशजनक असल्याचे धजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी शनिवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की युतीच्या मुद्द्यावर धजदचे नेते भाजपकडे गेले हे …
Read More »बँक खात्यातून दोन ग्राहकांची २१ हजाराची रोकड लंपास
निपाणी (वार्ता) : ग्राहकांना कोणतीच माहिती नसताना दोघा ग्राहकांच्या खात्यातून २१ हजाराची रोकड लंपास झाल्याची घटना शनिवारी (ता.३०) घडली. याबाबत सायबर क्राईम विभागाकडे ग्राहकांनी तक्रार केली आहे. या घटनेमुळे बँक ग्राहकातून भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी सांगितलेली अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास शिरगुप्पी येथील किरण …
Read More »महात्मा गांधी जयंती निमित्त निपाणीत सोमवारी अभिवादन
निपाणी (वार्ता) : येथील गांधी चौकातील महात्मा गांधीजींचा पुतळ्याजवळ सोमवारी (ता.२) ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता, विविध संघटनांच्या वतीने महात्मा गांधीजींना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. एन. आय. खोत, प्रशांत गुंडे, जयराम मिरजकर, सुधाकर माने, बाबासाहेब मगदूम, स्वाभिमानी शेतकरी …
Read More »बेडकिहाळ येथे ५ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा
‘स्वाभिमानी’चेअध्यक्ष राजू शेट्टींची उपस्थिती निपाणी (वार्ता) : चिक्कोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, स्वाभिनी शेतकरी वाहतूकदार संघटना व हसिरू क्रांती संघटना यांच्या सहकाऱ्याने उसाला मागील गळीत हंगामाचे ४०० रुपये फरक बिल मिळाले पाहिजे. जयसिंगपूर ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे यंदाची एफआरपी अधिक मागणी दर मिळालाच पाहिजे. उसाला …
Read More »समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा
शरद पै : रोटरी तर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळेच अनेक जण मोठ मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.देशाच्या जडणघडणीत शिक्षकासह अभियंत्यांचे काम महत्त्वाचे आहे. देशाचे वर्तमान आणि भविष्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे मत रोटरीचे जिल्हा प्रांतपाल शरद पै यांनी व्यक्त …
Read More »बोरगाव ‘अरिहंत’च्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील
उपाध्यक्षपदी सतीश पाटील; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : कर्नाटकानंतर महाराष्ट्र राज्यातही पदार्पण करीत सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री अरिहंत को- ऑप. क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल. अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील व उपाध्यक्षपदी सतीश पाटील (खडकलाट) यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे रविवारी मोदेकोप येथे मोफत आरोग्य शिबीर
खानापूर : अखिल भारतीय कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर यांचे मार्फत मोफत नेत्र शिबीर रविवार दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी विश्व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तालुका खानापूर मधील नागुर्डा ग्रामपंचायत मधील मोदेकोप मराठी शाळा मोदेकोप येथे भव्य मोफत नेत्र शिबिर सकाळी ठीक 10 ते दुपारी 3 पर्यंत खानापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta