मौजमजेची पार्टी पडली महागात.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर निपाणीहून संकेश्वर अनंतविद्यानगरकडे भरवेगात येणाऱ्या मोटारसायकलचा ताबा सुटून खड्ड्यात जोराने कलंडून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तिघे मित्र जागीच ठार झाले असून एकाचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पावणेबाराच्या दरम्यान …
Read More »डी. के. शिवकुमार यांच्यामुळेच हर्षची हत्या : आमदार पी. राजीव
चिक्कोडी : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बेजबाबदार आणि चिथावणीखोर विधानामुळेच शिमोग्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ता हर्ष याची हत्या झाल्याचा घणाघाती आरोप रायबागचे आ. पी. राजीव यांनी केला. चिक्कोडीतील जयप्रकाश नारायण सभागृहात भाजपतर्फे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आ. पी. राजीव यांनी …
Read More »खानापूर तहसील कार्यालयाच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे तहसील कार्यालय आणि त्याचा आवार म्हणजे अस्वच्छतेचे साम्राज्य बनले आहे. तहसील कार्यालयाच्या बाजुला असलेल्या माळ जागेत झाडे जुडपे वाढली आहेत. त्याच ठिकाणी तालुक्यातुन तहसील कार्यालयाच्या कामासाठी आलेल्या नागरिकाकडून उघड्यावर लघुशंका केली जाते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम तहसील कार्यालयावर तसेच कामासाठी …
Read More »शाळांना १० एप्रिल ते १५ मे उन्हाळी सुट्टी
शाळांच्या सुट्टीत बदल, १६ मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ बंगळूर : शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काही बदल केले आहेत. चालू शैक्षणिक वर्ष ९ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांना १० एप्रिल ते १५ मे या कालावधीत उन्हाळी सुट्या देण्याचा निर्णय …
Read More »हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नीची खानापूर म. ए. समितीकडून विचारपूस
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न चळवळीत १९५६च्या आंदोलनात आहुती दिलेले हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागाप्पा होसुरकर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. निडगल मुक्कामी माहेरगावी त्यांचे वास्तव्य आहे, गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून आहेत. ही बातमी समजल्यानंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …
Read More »संकेश्वरात विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटसचे शानदार उद्धघाटन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नेहरु रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटस दुकानाचे उद्धघाटन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी फित सोडून केले. यावेळी श्रींची पादपूजा शुभंम बागलकोटी यांनी केली. उपस्थितांचे स्वागत बसवराज बागलकोटी यांनी केले. यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, प्रकाश कणगली, शिवानंद संसुध्दी, डॉ. टी.एस.नेसरी, के.के.मुळे, संगम साखर …
Read More »तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लब आणि श्री जनरल हाॅस्पिटल खानापूर यांच्या सौजन्याने तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी नुकताच संपन्न झाली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी डाॅ. कविता मुजूमदार, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, डाॅ. अजित हुंडेकर, डाॅ. अभिषेक मुगरवाडी, डाॅ. प्रताप, तसेच नितीन मुजूमदार आदीचे पुष्पहार घालुन …
Read More »खानापूरातील रस्त्याच्या बाजूचा कचरा अन्यत्र हलवावा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह व तालुका अंतर्गत येणाऱ्या खानापूर कोर्टपासून शांतीसागर हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे गांधी नगर, हुडको कॉलनी, हलकर्णी, हिंदूनगर ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्यावरील कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे माणसांच्या आरोग्यावरही …
Read More »खानापूरात हर्ष हत्येच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी शिमोगा जिल्ह्यात बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा खून करण्यात आला. खून करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी खानापूर तालुका बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हिंदूस्थान संघटना, तसेच भाजप आदींनी बजरंगदल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले. …
Read More »समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्यांना एकीने देणार उत्तर
खानापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना एकीने उत्तर देण्याचा निर्धार करून निषेध खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आला. तसेच मार्च महिन्यात मराठी नाही तर टोल नाही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्न आणि इतर विषयांवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta