Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

बंगळुरू-हुबळीसह 5 ‘वंदेभारत एक्सप्रेस’ना एकाच दिवशी हिरवा झेंडा

  नवी दिल्ली : देशाची पहीली सेमी हायस्पीड विना इंजिनाची ट्रेन ‘वंदेभारत एक्सप्रेस’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेग आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेल्या या गाड्या देशातील विविध राज्यात चालविल्या जात आहेत. धार्मिक पर्यटनासाठी देखील वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आता येत्या 26 जून रोजी देशातील आणखी पाच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेसना …

Read More »

नायजेरियात बोट उलटली; १०० जणांच्या मृत्यूची भीती

  नायजेरियामध्ये सोमवारी पहाटे नायजर नदीत बोट उलटून शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएनएनने स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एएनआयने याची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बोटीवर ३०० लोक होते. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हा …

Read More »

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांच्या रिंगणात उतरणार सर्व केंद्रीय मंत्री

  नवी दिल्ली : आगामी काळातील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. संघाकडून मिळालेल्या सल्ल्यांनंतर राजकीय समिकरणांबरोबरच जातीय समिकरणे सुधारण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान पक्ष नेतृत्वाकडून एक मोठा निर्णय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व मंत्री …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ५.४ तीव्रतेचा भूकंप; दिल्लीसह उत्तर भारतातही धक्के

  नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये आज ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. एचपी, चंदीगड, पंजाब आणि सर्व लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले असावेत. कदाचित आफ्टरशॉक मुख्य धक्क्यापेक्षा कमी तीव्रतेचा असेल, अशी माहिती डॉ. ओपी मिश्रा, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली आहे. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि …

Read More »

बिपरजॉय वादळाने जोर पकडला; सर्व यंत्रणा सज्ज, नरेंद्र मोदींनी घेतली आढावा बैठक

  नवी दिल्ली: बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान ‘बिपरजॉय’ या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी …

Read More »

बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, खराब हवामानामुळे काही उड्डाणं रद्द तर काही विलंबाने

  नवी दिल्ली : गुजरातच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार असून पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याचं दिसून येतंय. एअर इंडिया, स्पाईसजेटकडून बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील तीन दिवस विमान सेवेवर परिणाम होणार असल्याची माहिती आहे. काही उड्डाण रद्द होण्याची शक्यता बिपरजॉय चक्रीवादळामुळे …

Read More »

अमेरिकेतील एका घरात गोळीबार; तिघांचा मृत्यू

  अमेरिकेतील अ‍ॅनापोलिस या शहरातील एका घरात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तर इतर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडलेले अ‍ॅनापोलिस हे शहर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. पासून ३० मैलावर म्हणजेच सुमारे ५० किमीवर आहे, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिल्याचे वृत्त …

Read More »

मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा

  पुणे : नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात धडकलाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेय, त्यामुळे चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार …

Read More »

पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

  पुणे : केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण …

Read More »

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, …

Read More »