Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

खानापुरात बुडालेल्या मुलांचे मृतदेह शोधण्यात यश

बेळगाव : खानापुरातील दुर्गानगरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रोहित अरुण पाटील (वय १५) आणि श्रेयस महेश बापशेट (वय १३) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी रोहित व श्रेयस हे दोघेही मित्रांसमवेत नदीकाठावर खेळायला गेले होते. त्यावेळी अंघोळीसाठी म्हणून ते नदीत उतरले. त्यावेळेची या दोघांचा बुडून …

Read More »

हल्याळवर शोककळा : अखेर तीन भावांचेही मृतदेह सापडले

अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे …

Read More »

धक्कादायक! त्या दोघा मुलांचा नदीत बुडून मृत्यू

बेळगाव : बेपत्ता झालेली दुर्गानगर खानापूर येथील दोन मुलं खानापूरनजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत. दुर्गानगर येथील दोन मुले श्रेयश महेश बाबसेट (वय 13) व रोहित अरूण पाटील (वय 15) सोमवारी बेपत्ता झाली होती. ते दोघेही 2.30 पासुन घरातुन बाहेर पडले होते. श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रँक लाल …

Read More »

भाजपच्या त्रिकूटाने विश्वासघात केला; रमेश जारकीहोळींचा गंभीर आरोप

अचानक दिल्लीला रवाना बंगळूर : भाजपच्या त्रिकूटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला.आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोन वाजता अचानक …

Read More »

खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …

Read More »

कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी

लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन …

Read More »

भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन बेळगाव : दिशादर्शक मराठी फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि दोन भाषिकात तेढ निर्माण करणाऱ्या फेसबुक पेजवर कार्यवाही करावी याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त श्री. विक्रम आमटे याना निवेदन देण्यात आले.नमूद विषयाप्रमाणे देसुर गावाच्या हद्दीत असणाऱ्या दिशादर्शक फलकाची 26 जूनच्या …

Read More »

लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवा

म. ए. युवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवावा याबाबत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेनमूद विषयाप्रमाणे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे 21 जून 2021 पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत आहे. पण …

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन…

खानापूर : कापोली, शिवठाण ते कोडगई रस्त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल तर पावसाळ्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उप कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिले आहे.कापोली ते कोडगई रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र …

Read More »

कृषक आणि कामगार विरोधी कायदे घ्या मागे

बेळगाव : वटहुकूम आणून अंमलात आणलेले कृषी आणि कामगार कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करुन हे कायदे रद्द करावेत अशी मागणी करुन बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषक विरोधी कायदे आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करुन शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य …

Read More »