Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगाव

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळा; शरदचंद्र पवार सोमवारी बेळगावात

  बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंदिर येथे दुपारी चार वाजता जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील व दिनेश ओऊळकर यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, …

Read More »

येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश

  बेळगाव : गव्हर्नमेंट मराठी मॉडेल शाळा येथे दि. 21/8/2024 रोजी येथे  क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत थ्रो-बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. रिलेमध्ये श्रीनाथ …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेचा उद्या समारोप

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप शनिवारी सायंकाळी होणार आहे. या स्पर्धेत एकंदर 28 संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यात्तील संघांचा समावेश आहे. बुधवार व गुरुवारी एकंदर अकरा महिला भजनी मंडळानी आपली कला सादर केली. शुक्रवार …

Read More »

रस्त्यासाठी अनगोळवासीयांचे आंदोलन!

  बेळगाव : बेळगावच्या अनगोळमधील रघुनाथपेठ रस्ता अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आज स्थानिकांनी केली. बेळगावातील अनगोळमधील रघुनाथ रोडची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक त्रस्त असून, दररोज अपघात होत आहेत. अनेक बलाढ्य आमदार, नगरसेवकांसह संबंधित …

Read More »

बेळगावसाठी 100 एकर जागेत स्टार्टअप पार्कची योजना

  बेळगाव : बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री एम. बी. पाटील यांनी येथील काँग्रेस कार्यालयाच्या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना स्टार्टअप्स आणि प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करून बेळगाव शहरासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी, बेळगावसाठी 100 एकर जागेत स्टार्टअप पार्कची योजना आहे. बेळगावात स्टार्टअप पार्क विकसित …

Read More »

कंगना राणौत यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाकडून निषेध

  बेळगाव : शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनी भाजप खासदार व अभिनेत्री कंगना राणौत यांच्याविरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डाॅ. सोनाली सरनोबत यांनी आज तीव्र निषेध केला आहे. भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना “सिमरनजीत सिंग मान यांच्या …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर कारची रिक्षाला धडक : एक ठार

  बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ऑटोतील प्रवासी ठार आणि चालक जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर घडली. अपघातात ऑटोरिक्षा मधील ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशाचे नांव मीरा साब (वय 30, रा. गुजरात) असे आहे. अपघातग्रस्त कारचा चालक …

Read More »

ओमानमध्ये कार- लॉरी अपघातात गोकाक येथील चौघांचा मृत्यू

  बेळगाव : ओमानमध्ये कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गोकाक येथील आई, मुलगा, मुलगी आणि जावई या चार जणांचा मृत्यू झाला. गोकाक येथील विजया मायाप्पा तहसीलदार (52), पवनकुमार मायाप्पा तहसीलदार (22), पूजा आदिशा उप्पार (21) आणि अदिशे बसवराज उप्पार (32) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मूळचे गोकाकचे …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांनी केले श्रमदानातून येळ्ळूर रस्त्याचे डागडुजीकरण

  बेळगाव : आज दिनांक 30-08-2024 रोजी सामाजिक भान ठेवत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्रमदानातून येळ्ळूर रस्त्याचे डागडुजीकरण करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून येळ्ळूर रस्त्याची मोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना वाहन चालवणे आता खूपच कठीण झाले आहे. कारण रस्त्याची पातळी समतोल नसल्यामुळे या मार्गावरून वाहन नेताना दुचाकी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस

    बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या सहकारी शिक्षिका जयश्री पाटील या उपस्थित होत्या. यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा प्रमुख पाहुण्या जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त …

Read More »