Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगाव

बेळगाव महानगरपालिकेची 27 ऑगस्ट रोजी तातडीची बैठक

  बेळगाव : बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात जमीन गमावलेल्या बाधितांना कोट्यावधींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिल्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात नुकसान झालेल्या जमीन मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बजावले आहेत. …

Read More »

इस्कॉन आयोजित कृष्ण कथा महोत्सव

  बेळगाव : “कलियुगात लोक संकुचित वृत्तीने अफवा पसरवितात तशीच अफवा पसरवून द्वापरयुगातही लोकांनी भगवंतांना सोडले नाही.” अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सायंकाळी बोलताना दिली. इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्ण कथा महोत्सवातील दुसऱ्या दिवशी त्यांनी सतराजित राजा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये स्यमंतक मनीमुळे …

Read More »

कॅपिटल वन संस्थेला ३२.१८ लाख रुपयांचा नफा, सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर

  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे नुकतीच पार पडली संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने सुमारे २० कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवी १५५. ०२ कोटी रुपयांचे खेळते भांडवल …

Read More »

शहापूर येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

  बेळगाव : शहापूर येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कल्पना शंकर पाटील (वय ५१, रा. बसवण गल्ली, शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. कल्पना या दम्याच्या आजाराने त्रस्त होत्या. यामुळे त्यांची मानसिक स्थिती …

Read More »

बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई करा : बेळगावात भाजपाची निदर्शने

  बेळगाव : राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करून कारवाई करण्यात यावी आणि मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगावात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गुरुवारी बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात छेडलेल्या आंदोलनात धरणे धरले. काँग्रेसने स्वतः चोरी करून आता …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ- पोलिस प्रशासन आढावा बैठक

  बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मंडळांचे 70 हुन अधिक पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मार्केट पोलीस निरीक्षक एम. के. धामनवर उपनिरीक्षक विठ्ठल हावनवर व्यासपीठावर उपस्थित होते. बेळगावातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत …

Read More »

येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

  बेळगाव : येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून श्री. विपुल पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी श्री. विपुल भाऊराव पाटील यांच्याकडून …

Read More »

महिलांच्या सुरक्षेवर जिल्हा प्रशासन अधिक लक्ष देणे गरजेचे; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी

  बेळगाव : शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेवर भर देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी सांगितले की, एसओपीचे पालन न करणाऱ्या संस्था आणि वसतिगृहे बंद करावी लागतील. राज्य महिला …

Read More »

उच्च न्यायालयाने बुडाला फटकारले! 33 गुंठे जमीन परत देण्याचे आदेश

  बेळगाव : 20 वर्षांपूर्वी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बेळगावच्या कुवेंपुनगरमध्ये 33 गुंठे जमीन संपादित केली. याविरोधात जमीन मालकाने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने बेळगाव शहर विकास प्राधिकरणाला सदर जमीन मालकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. 20 फेब्रुवारी 2004 रोजी बेळगावातील कुवेंपू नगर येथील 33 गुंठे जमीन बुडाकडून …

Read More »

देशस्थ ऋ्ग्वेदी ब्राह्मण मंडळावर अभिनंदनिय निवड

  बेळगाव : मुंबई येथील अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारणीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. बिनविरोध झालेल्या या कार्यकारणीत एकंदर 15 सदस्य निवडण्यात आले असून त्यामध्ये बेळगाव समर्थ अर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व बेळगाव देशस्थ ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष अभय जोशी आणि देशस्थ ब्राह्मण संघाचे चेअरमन विनायक जोशी या …

Read More »