Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

रोटरी इलाईटतर्फे उद्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईट आणि चिदंबरदास राजाराम महाराज पांडुरंग महाराज समाधी मंदिर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी 17 मे 2025 रोजी सायंकाळी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘वजन आणि मधुमेह कमी करण्यासाठी डॉ. दीक्षित जीवनशैली’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. डॉ. श्रीकांत जिचकर …

Read More »

कुराण जाळणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचा एल्गार!

  चन्नम्मा सर्कल येथे हजारो मुस्लिम समर्थक रस्त्यावर; निषेध मोर्चात तरुणांची घोषणाबाजी बेळगाव : तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील मशिदीत कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांना जाळणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत मुस्लिम समुदायाने शुक्रवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे मोठे आंदोलन केले आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तत्पूर्वी, दुपारची नमाज पूर्ण …

Read More »

संतीबस्तवाड प्रकरण : ग्रामीण पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ निलंबित

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात कुराण धर्मग्रंथ चोरी आणि जाळल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बेळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग यांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, कुराण जाळल्याप्रकरणी सीपीआय …

Read More »

संतिबस्तवाड येथे एप्रिलमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी चौघांना अटक

  बेळगाव : गेल्या एप्रिलमध्ये संतिवस्तावाड गावात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे (30), मुथप्पा भरमा उचवाडे (26), लक्ष्मण नागप्पा नाईक (30) आणि शिवराज यल्लाप्पा गुदली (29) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले. संतिबस्तवाड येथील ईदगाहचे …

Read More »

अखिल लिंगायत नुरू कायकी पंगड महासंघाच्या राज्य आणि बेळगाव जिल्हा युनिटचे उद्घाटन

  बेळगाव : अखिल लिंगायत नुरू कयक पंगड महासंघाच्या राज्य आणि बेळगाव जिल्हा युनिटचे शानदार उद्घाटन नुकतेच पार पडले. शहरातील कन्नड भवन येथे बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात कारंजीमठाचे श्रीगुरुसिद्ध महास्वामीजी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते जगज्योती बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष अरविंद परवशेेट्टी, संस्थापक …

Read More »

फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी केली बेघर व्यक्तीला मदत

  बेळगाव : बेळगावातील टिळकवाडी येथील सेंट्रल केअर हॉस्पिटलसमोर रेल्वे गेटजवळ फूटपाथवर बेघर आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीला फेसबुक फ्रेंड्स सर्कलने मदतीचा हात पुढे केला. या व्यक्तीची दयनीय अवस्था पाहून फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी त्वरित टिळकवाडी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी आणि …

Read More »

खोटी बातमी पसरवणाऱ्या अनिस उद्दीन विरोधात गुन्हा दाखल

  पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती बेळगाव : कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर आरएसएस आणि हिंदू संघटनांनी हल्ला करून तोडफोड केली, अशी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अनिस उद्दीन नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज पत्रकार परिषदेत …

Read More »

श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे बेळगांवात “उपनयन संस्कार” समारंभ

  बेळगांव : हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण होण्यासाठी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार होणे आवश्यक आहेत. मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा घरोघरी सुरू ठेवणे काळाची गरज असून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्रित झाले पाहिजे. भविष्यात समस्त हिंदूधर्मियांनी मोठ्यासंख्येने आपल्या पाल्यांवर उपनयन संस्कार करून देश बलवान करण्यासाठी समर्पित व्हावे. कारण धर्म …

Read More »

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेल्या मंत्र्याविरुद्ध बेळगावतही एफआयआर दाखल

  बेळगाव : ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तरादरम्यान पत्रकार परिषदेत लष्करी माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते विजय शाह यांच्याविरुद्ध बेळगावमध्येही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एसपी भीमाशंकर गुळेद यांच्या सूचनेवरून बेळगावातील सीएनएन पोलिस ठाण्यात भाजप नेते विजय शाह यांच्याविरुद्ध …

Read More »

बेळगावात मराठा जगदगुरू श्री मंजूनाथ स्वामीजींच्या सान्निध्यात भक्तीमय संध्या संपन्न

  बेळगाव : बेळगावातील वडगाव येथील पटवर्धन ले-आऊट गार्डनमध्ये आज दुपारी एक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मराठा समाजाचे आधारस्तंभ, परमपूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांची पावन उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गोपाळ बिर्जे, वर्षा बिर्जे, …

Read More »